Monday, 3 March 2014

सावरकर राष्ट्रीय स्मारकात 7 मार्चला विक्रमराव सावरकर यांची शोकसभा


सावरकर राष्ट्रीय स्मारकात 7 मार्चला विक्रमराव सावरकर यांची शोकसभा

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे संस्थापक सदस्य, हिंदुमहासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ हिंदुसंघटक विक्रमराव सावरकर यांची सर्व पक्षीय शोकसभा स्वातंत्र्यवीर सारवकर राष्ट्रीय स्मारक व हिंदुमहासभा यांच्या संयुक्त विद्यमाने 7 मार्च या दिवशी सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे होणार आहे.

या शोकसभेस विविध संघटना तसेच संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होतील. सावरकरभक्त तसेच देशप्रेमी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून विक्रमराव सावरकर यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Thursday, 27 February 2014

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी

स्वा. सावरकर स्मारकात आत्मार्पण दिनी चर्चासत्राचा सूर 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जोपर्यंत मध्यमवर्गीय समाज आपली मानसिकता बदलत नाही तसेच जनमताचा रेटा लावत नाही, तोपर्यंत समाजमन बदलणार नाही. असा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या सावरकरांची विजाननिष्ठा व सुशिक्षितांची अंधश्रद्धा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात व्यक्त झाला. 

अत्यंत रंगतदार झालेल्या या चर्चासत्रात प्रसिद्ध विजान कथा लेखक बाळ फोंडके, खासदार भारतकुमार ऱाऊत यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका मंजिरी मराठे यांनी केले. प्रारंभी स्मारकाचे संस्थापक सदस्य विक्रमराव सावरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, मंजिरी मराठे, अनुराधा खोत, राजेंद्र वराडकर आदी मान्यवर तसेच सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता बदलली गेली पाहिजे, सध्या आपल्या राज्यात अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र त्याचे पालन कितीजण करता, हा संशोधनाचा विषय आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदादेखील समाजाने प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी 1-2 पिढ्या जाव्या लागतील. असे विचार बाळ फोंडके यांनी व्यक्त केले. श्रद्धा ही प्रवृत्तींवर अवलंबून असते. स्वतःच्या मनःशांतीसाठी जर अध्यात्माचा स्वीकार केला तर ती अंधश्रद्धा असू शकत नाही, समाजात तणाव निर्माण करणा-या किंवा हानीकारक बाबी याला मात्र अंधश्रद्धा म्हणून विरोध झालाच पाहिजे. सुशिक्षित समाज अंधश्रद्धा पाळतो किंवा अशिक्षित समाजच पाळतो, असा भेदभाव असू शकत नाही. अशिक्षित मंडळी देखील विजानवादी असतात. त्यामुळे अशा बाबी वर्गीकरणाच्या चौकटीत असू शकत नाही. त्याच्याकडे डोळस नजरेने पाहणे आणि भावनाविश्वात आनंद मिळेल, अशाच बाबींचा स्वीकार, अवलंब व अनुकरण आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

राजकारणी मंडळींसाठी अंधश्रद्धा हा विषय अनुयायांच्या अनिवार्यतेतून आलेला असतो, अनेकदा नेते मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार अवलंब करावा लागतो. समाजातील या बाबी केवळ संस्कारातूनच दूर होऊ शकतील. संस्कार हा स्वतःच्या मनःशांतीसाठी असावा. अध्यात्माचा स्वीकारदेखील त्यातूनच व्हावा. हिंदू धर्म उदारमतवादी मानला जातो. पण आजही अनेक देवळांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही, ही अंधश्रद्धाच आहे. गीतेमध्ये सांगितलेले जान हे तत्वजान आहे. मात्र या गीतेलाच देव्हा-यात बसवून किंवा तिच्या साक्षीने वाईट कृत्य न करण्याची शपथ घेणे व नंतर त्याच्या विरोधात वागणे, हे परस्पर विरोधी आहे. दांभिकपणा आहे. त्याच्याकडे समाजानेच डोळसपणे पाहिले पाहिजे. आपला दबाव याबाबतीत निर्माण केला पाहिजे. महाराष्ट्राला अनेक समाजसुधारकांची परंपरा आहे. या परंपरेतील मंडळी राजकारणी नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी मंडळीं मोठ्या प्रमाणावर होती. पण नंतरच्या काळात ती झाली नाहीत, अशी खंत खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली. 

द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या प्रसिद्ध खुमासदार शैेलीत दोघांकडून प्रश्नांची उत्तरे मिळवली. त्याचबरोबर आपण नास्तिक होतो पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य वाचल्यानंतर डोळसपणे श्रद्धेकडे पाू लागलो, असे विचार त्यांनी व्यक्त केले. पु. ल. देशपांडे यांनी सावरकर दर्शन कार्यक्रमात केलेल्या भाषणांच्या आधारे सावरकरांच्या विचारांवरील प्रश्नांची निर्मिती केलेले हे चर्चासत्र उत्तरोत्तर रंगत गेले. त्याला उपस्थितांनी अनेकदा टाळ्यांच्या कडकडाटात साद दिली. शेवटी मंजिरी मराठे यांनी संपूर्ण वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Monday, 24 February 2014

ज्येष्ठ हिंदुसंघटक विक्रमराव सावरकर यांचे निधन





ज्येष्ठ हिंदुसंघटक विक्रमराव सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य व हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कृतिशील कार्यकर्ते विक्रमराव सावरकर यांचे रविवार (ता. 23) दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे पृथ्वीराज व रणजित आणि स्नुषा असा परिवार आहे. या वृत्तामुळे सावरकरभक्त, देशप्रेमी व हिंदुत्वनिष्ठ नागरिकांमध्ये एकच शोककळा पसरली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रमराव यांनी जाज्वल्य देशभक्तीचा व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले. त्यांच्या हिंदु संघटन कार्यामुळे त्यांचा एक विशेष प्रभाव हिंदुमहासभेच्या कार्यावर राहिला आहे. ऱाष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर अखंड हिंदुस्थान तसेच समान नागरी कायदा, हिंदूंचे रक्षण आदींसाठी कार्य केले तसेच त्यांचा अनुयायीवर्ग देखील संपूर्ण भारतभर निर्माण केला. सिमला कराराला विरोध करण्यासाठी गनिमी काव्याने त्यांनी सिमल्यात इंदिरा गांधी यांच्याकडे निषेध केला. मुंबई महानगरपालिकेत वंदे मातरम् हे देशभक्ती गीत म्हणावे, यासाठी मोर्चा काढला तसेच विधानसभेत चर्चा घडवून आणली. त्यावेळी विधानसभेने हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांना शिक्षादेखील सुनावली होती. मात्र आंदोलन यशस्वी झाले. भिवंडी येथे शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठी त्यांनी यशस्वी आंदोलनं केली. हिंदुत्वासाठी राजकीय कृतीशील कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालीदेखील अटक करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून ठाणे येथे सैनिक शाळा त्यांनी सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. प्रकृती अस्वस्थ असली तरी ते सावरकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाचे अनेक उपक्रम प्रत्यक्षात साकारले तसेच स्मारकाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यांच्या या निधनाचे वृत्त कळताच सावरकरभक्तांमध्ये तसेच त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक तसेच हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी गर्दी केली. त्यांच्या निधनाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन गडकरी, खासदार भारतकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रगट केला आहे.


Monday, 10 February 2014

Baba Ramdev visits Swatantrayaveer Savarkar Rashtriya Smarak..


Baba Ramdev visits Swatantrayaveer Savarkar Rashtriya Smarak...
राष्ट्रगुरू सावरकरांच्या स्वप्नातील

राष्ट्रनिर्मिती हवी - रामदेव बाबा

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रगुरु असून ते आपले आदर्श गुरूकुलमध्ये शिकत असल्यापासूनचे आहेत, त्यांच्या स्वफ्नातील राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी एकजूटीने प्रयत्न केले पाहिजे, असे ठाम विचार बाबा रामदेव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना बळकटी देण्याचे काम आपण केले पाहिजे, त्यांचे हिंदुत्व तसेच हिंदुरक्षणाच्या विचारांना अवलंब आपण प्रत्यक्षात केला पाहिजे. त्यांना दोन वेळा जन्मठेप झाली तरीसुद्धा ते आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. त्यांच्या अंदमान येथील तुरुंगाला आपण भेट देणार असून तेथे योग शिबिराचे आयोजन करणार आहोत, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे आपल्यासाठी मंदिरासारखे आहे. स्मारकाशी आपले जुने संबंध असून ते दुसरे घरच आहे, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर रामदेव बाबा यांनी अखंड भारत करके रहेंगे चा नारा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह अनुराधा खोत, सह कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी स्मारकाची पाहणी केली. स्मारकाच्या वतीने त्यांना सावरकरांचा अर्धाकृती पुतळा, नुकत्याच प्रकाशित झालेल्या सावरकरांच्या उर्दू गझला आणि हिंदी गीतांवर आधारित हम ही हमारे वाली हैं, या सीडीची प्रत तसेच माझी जन्मठेप यांची भेट देण्यात आली. यानंतर त्यांनी स्मारकाच्या मुष्टियुद्ध केंद्राची तसेच रायफूल शूटिंग रेंजची पाहणी केली. यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच बंदूक हाताळताना त्यांनी अव्वल व अचूक नेमबाजी करून उपस्थितांना थक्क केले.

Thursday, 30 January 2014

महाराष्ट्र मिलिटरी स्कूल

                                                    महाराष्ट्र मिलिटरी स्कूल

सैनिकी शिक्षण हे शत्रूशी लढा देण्याइतकेच जितके महत्त्वाचे आहे तितके नागरी जीवनात वावरताना तसेच देशाची सेवा करताना अत्यंत आवश्यक आहे, हाच दृष्टीकोन ठेवत गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सातत्याने सैनिकी शिक्षणासाठी व्रतस्थाप्रमाणे महाराष्ट्र मिलिटरी स्कूल कार्यरत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून ही शाळा सुरू असून सैनिकीकरण व विज्ञानवाद या तत्त्वावर या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

तळवली, टोकावडे (मुरबाड) परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या शाळेत केवळ मुलांनाच इंग्रजी माध्यमातून निवासी प्रशिक्षण दिले जाते. पाचवी ते दहावीपर्यंत ही शाळा असून शालेय अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, स्वसंरक्षण, रायफूल शूटिंग, साहसी खेळ, कराटे, मुष्टियुद्ध आदी विविध स्वरूपाचे ज्ञान प्रात्याक्षिकांसह विद्यार्थ्यांना दिले जाते. हॉकीच्या खेळासाठी या टिकाणी राष्ट्रीय स्तरावरील मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या मुळे हे मैदान हे विविध स्पर्धांसाठी एक फार मोठे आकर्षण ठरलेले आहे. या ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांना मुष्टियुद्ध व हॉकी या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू व संस्थेचे संचालक रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार चालू आहे. वेगवेगळ्या संकल्पना तसेच नवे प्रयोग सातत्याने या ठिकाणी करत विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकासाचे कार्य नेटकेपणाने करण्यात येते. विद्यार्थ्यांमधील सुफ्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यात वैयक्तिकपणे लक्ष देऊन त्याला अनुकूल असा वाव दिला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांकडून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. निवृत्त लष्करी अधिकारीदेखील नियमितपणे या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना विविध तंत्र शिकवत असतात.

केवळ मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून या ठिकाणी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. महार्ष्ट्रातील सैनिकी शाळांमध्ये महार्ष्ट्रा मिलिटरी स्कूलचे स्थान अव्वल आहे. संस्थेच्या वतीने यंदापासून नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केवळ पाचवीपासूनच नव्हे तर दहावीपर्यंत अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेऊ इच्छिणाऱयांना त्याचा लाभ घेता येऊ शकेल. अधिक माहितीसाठी संपर्क ः 9221769500, 9270557599

Monday, 27 January 2014

Savarkar Songs: Press Release


Amitabh Bachchan introduces Urdu Ghazals of Swatantryaveer Savarkar
Mumbai, January 2014
Amitabh Bachchan, one of the greatest actors of Bollywood, also well known for his distinct voice, has now lent his voice to introduce the gazals written by Swatantryaveer Savarkar during his life sentence at Andaman in 1921. Manuscript containing these Urdu Ghazals was discovered by Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak. These gazals, alongwith other songs were recorded in the voices of renowned singers from Bollywood.
Amitabh Bachchan's voice has truly captured the patriotic sentiments penned by eminent writer-director Ved Rahi and has perfectly complemented Veer Savarkar's songs.
Ranjit Savarkar, Chairman,  Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, said “We are extremely grateful to Shri. Amitabhji Bachchan for rendering his enchanting voice to introduce these songs. His voice truly enlivens the spirit and passion in which the great freedom fffighter has expressed his love for the motherland “.
Ranjit Savarkar presented a copy of Veer Savarkar's famous memoirs of his days and plight at Andaman 'My Transportation for Life' and a replica of manuscript in which the latter penned the verses in Andaman, to Shri. Amitabh Bachchan. Same day Shri Amitabh Bachchan twitted :-"Incomprehensive to fathom what freedom fighters went through to gain independence for nation …! Are they acknowledged enough?  Had visited Andaman island, Kala pani and the prisons where freedom fighters were kept. Atrocious stories of their Torture!".
This CD will be released on 21st January at 7 pm in a function scheduled in the auditorium of Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak at Dadar,  Mumbai, by  the famous authors of Marathi, Hindi & Guajarati – namely, Shri Arun Sadhu, Shri Vishvanath Sachadev and Dr. Sharad Thaker.
This CD comprises three original compositions of Swatantryaveer Savarkar - both Urdu & Hindi - and Hindi translations of Marathi poems ‘ Hindu Ekata Geet ‘, ‘Swatantrata Strotra      [ Jayo Stutey ] ‘, ‘Aatmabal ‘ and  ‘ Amucha Swadesh Hindustan ‘ by Ranjit Savarkar. Three more Marathi compositions translated from – ‘ Hindi Samagra Savarkar ‘ – published by Prabhat Prakashan, Delhi, have been added.  Swaradheesh Bharat Balavalli is the Music Director and the orchestration is conducted by famous Music Director (late) Anil Mohile.  Popular singers of Bollywood – Sarvashree Suresh Wadkar, Shankar Mahadevan, Dr. Jaspinder Narula, Shaan, Javed Ali, Rahul Deshpande, Swapnil Bandodkar, Bharat Balavalli, Sushree Sadhana Saragam, Vaishali Samant have lent their melodious voices to the songs.  Marketing of this CD will be done by Universal Music.
Live rendition of songs  by Suresh Wadkar, Sadhana Saragam, Dr. Jaspinder Narulla, Vaishali Samant and Bharat Balavalli will be complimented by dance performances by Choreographer Shri Gururaj Korgaonkar.
  All are cordially invited to grace the occasion.