Monday, 10 February 2014

Baba Ramdev visits Swatantrayaveer Savarkar Rashtriya Smarak..


Baba Ramdev visits Swatantrayaveer Savarkar Rashtriya Smarak...
राष्ट्रगुरू सावरकरांच्या स्वप्नातील

राष्ट्रनिर्मिती हवी - रामदेव बाबा

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रगुरु असून ते आपले आदर्श गुरूकुलमध्ये शिकत असल्यापासूनचे आहेत, त्यांच्या स्वफ्नातील राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी एकजूटीने प्रयत्न केले पाहिजे, असे ठाम विचार बाबा रामदेव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना बळकटी देण्याचे काम आपण केले पाहिजे, त्यांचे हिंदुत्व तसेच हिंदुरक्षणाच्या विचारांना अवलंब आपण प्रत्यक्षात केला पाहिजे. त्यांना दोन वेळा जन्मठेप झाली तरीसुद्धा ते आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. त्यांच्या अंदमान येथील तुरुंगाला आपण भेट देणार असून तेथे योग शिबिराचे आयोजन करणार आहोत, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे आपल्यासाठी मंदिरासारखे आहे. स्मारकाशी आपले जुने संबंध असून ते दुसरे घरच आहे, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर रामदेव बाबा यांनी अखंड भारत करके रहेंगे चा नारा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह अनुराधा खोत, सह कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी स्मारकाची पाहणी केली. स्मारकाच्या वतीने त्यांना सावरकरांचा अर्धाकृती पुतळा, नुकत्याच प्रकाशित झालेल्या सावरकरांच्या उर्दू गझला आणि हिंदी गीतांवर आधारित हम ही हमारे वाली हैं, या सीडीची प्रत तसेच माझी जन्मठेप यांची भेट देण्यात आली. यानंतर त्यांनी स्मारकाच्या मुष्टियुद्ध केंद्राची तसेच रायफूल शूटिंग रेंजची पाहणी केली. यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच बंदूक हाताळताना त्यांनी अव्वल व अचूक नेमबाजी करून उपस्थितांना थक्क केले.

No comments:

Post a Comment